|
ओळख
संगीत शारदा हे मराठीतील अत्यंत
गाजलेलं नाटक.
या नाटकाची
लोकप्रियता एवढी होती की
'संमतीवयाचा
कायदा'
याचे नाव
'शारदा
कायदा' (sharada
act)
असे पडले.
गंमत अशी की
संमतीवयाचा कायदा
1891
साली आला तर
नाटक 1899
साली.
मराठीतील पहिले
सामाजिक नाटक अशी त्याची ख्याती
आहे.
जरठ-कुमारी
(म्हातारा
नवरा व अतिशय तरुण बायको)
विवाह हा
नाटकाचा प्रमुख विषय आहे.
नाटकात इतरही
अनेक विषय हाताळले आहेत.
काही उघडपणे
तर काही सूचकतेने.
स्वातंत्र्याचा
विषय त्यात आहे.
कोदंड
(नाटकाचा
नायक)
म्हणतो
'आपआपल्यात
भेदभाव वाढत गेल्यामुळं
....
शेवटी त्याच
राष्ट्राचे दासानुदास झाले आणि या
सर्वाला कारण आमचे आम्हीच
!' 'रुढी
विरुद्ध धर्मशास्त्र'
असा एक संघर्ष
त्यात आहे.
संमतीवयाचा प्रश्न सूचकतेने
हाताळला आहे.
या काळी मुलगी
वयात येण्यापूर्वी तिचे लग्न लावले
जात असे.
शारदा ही
कदाचित घोडनवरी (वयात
आलेली)
असावी
(वय
केवळ साडेतेरा !)
पण तिचे लग्न
अजून झाले नाही हे मोठे लांच्छन
असल्याचे नाटकातील पात्रे बोलत
असतात !
नाटकात विजातीय विवाह
(चित्पावन
कोदंड-देशस्थ
शारदा अशा ब्राह्मणपोटजातीतील)
पुरस्कृत केला
आहे.
मात्र
'सगोत्र
विवाह' (शारदा-भुजंगनाथ)
हा निषिद्ध
मानला आहे !
ब्राह्मण लोक
गलिच्छपणे राहतात हे मोठ्या
सूचकतेने सांगितले जाते.
'क्या
गलीच्छ गली है ये !
ये बम्मन इतने
पाक !
और ऐसे
नाकिसीमें रहते है
!'
असे नाटकाला
एक शिपाई म्हणतो.
भट,
शास्त्री,
दीक्षित,
पुराणिक,
आचार्य
(भट्टाचार्य,
बिंबाचार्य),
उपाध्याय असे
व्यवसाय त्याकाळी ब्राह्मणांचे
असत.
जगद्गुरू
शंकराचार्य म्हणून या नाटकात एक
पात्र आहे.
हे पात्र
इतिहासाला धरून आहे की नाही याची
कल्पना नाही.
पण या
जगद्गुरूंचे एक प्रकारची सत्ता
ब्राह्मणवर्गावर चालत असावी असे
वाटते. 'सभामार्तंड'
अशी पदवी देणे,
धर्माध्यक्ष
म्हणून नेमणूक करणे हे त्याच्या
अधिकारात बसत असे.
नाटकात कदाचित विधवाविवाह करण्याचा
प्रयत्न असावा असे वाटते.
शारदेच लग्न
अर्धवट होते त्यानंतर तिचा नवरा
मरतो असे सूचित करणारी वाक्ये
त्यात आहेत. (हिरण्यगर्भ
इंदिराकाकू संवाद अंक पाचवा
प्रवेश पहिला 'संकटी
दुसरे संकट हे').
पण ते पुढच्या
प्रवेशात काढून टाकल्यासारखे आहे
(तो
वर जिवंत असल्याचे दाखविले आहे).
त्याकाळातली ही एक प्रेम कथा आहे.
नवरा-नवरी
त्यांचा विवाह परस्पर ठरवतात व तो
होतो.
इतर विवाह
मात्र एकमेकांना न बघता सर्रास
होत असावेत.
साखरपुडा
म्हणजे खरोखरच दिलेली खाण्याची
गोड वस्तु (लग्न
ठरले म्हणून)
होती,
'मुका
मुलगा होणे' (वयात
येणे वाजत गाजत साजरे होत असे.
शारदा ही नाटकाची नायिका.
ती चांगली धीट
आहे पण तिला वडील मारतात
(लग्न
कर म्हणून)
आणि मग ती
गरीब गायी सारखी होते.
'आम्ही
गाई जातिच्या'
असे तिला
म्हणावे लागते,
नवर्यास उलट
बोलुशकणारी तिची आई,
तिचे लग्न
लावून देतो म्हणणारा तिचा तालेवार
मामा आणि शारदा यांचे शारदाच्या
वडलांसमोर काहीच चालत नाही.
कदाचित
त्याकाळच्या रीतिप्रमाणे वडीलच
सर्व हक्क बाळगून असावेत.
या सर्वात
घरात असलेली (पण
रंगमंचावर न येणारी)
तिची विधवा
आत्या आहे.
दुसर्या
घरांची ही अशीच स्थिती असावी
(सुवर्णशास्त्र्यांच्या
मुली).
मुलींची लग्ने 12च्या
आत तर मग म्हातार्या पुरुषांना
निरुपाय म्हणून जरठ कुमारी
विवाहाला सामोरे जावे लागते.
या नाटकातले
वराचे वय 'अवघे
पाउणशे वयमान'
आहे.
हे जरा अती
होते.
पण इतर घोडनवर्यांचे
काय?
नायकाचे वय
24
आहे
(व
साडेतेरा वर्षाची वधू).
मग जे तिशीत,
चाळीशीत वा
पन्नाशीत असून लग्न करु इच्छितात
त्यांचे काय?
हा प्रश्न
नाटकात विचारला आहे.
(अंक
2रा
प्रवेश 4था).
त्याचे उत्तर
दिलेले नाही.
समाजातले जरठ-कुमारी
विवाह टाळायचे असतील तर अधिक
वयाच्या (विधवा)
स्त्रियांची
लग्न होणे जरुरी आहे.
हे सर्व
नाटकात प्रत्यक्षपणे सांगितले नाही.
पण तशी सूचना
मिळते.
त्याकाळी जेंव्हा आयुर्मान अगदी
कमी होते तेंव्हा नुसती म्हातारी
व्यक्त्ति दिसणे हे एक अप्रुप
असावे.
पोरे सोरे
नाटकातल्या म्हातार्या कडे चिडवत
असत.
या गोष्टीचा
नाटकात निषेध नाही.
'दंताजीचे
ठाणे उठले ...
कंबर होय कमान'
अशी थट्टा
नाटकाचा अविभाज्य भाग आहे.
नाटकात मौज
म्हणून हे वापरले गेले आहे.
नाटकात
चातुर्वण्याचा नेमका पुरस्कार नसला
तरी ब्राह्मणजातीच्या वरचेपणाचे
उल्लेख आहेत.
चार आश्रमांचा
सूचकतेने उल्लेख आहे.
कोदंड
पंचविशीचा असणे,
पुरुषांनी
पन्नाशीची झुळुक लागल्यावर लग्नाचा
विचार सोडून द्यावा आणि
भुजंगनाथाने पाउणशे वयमानानंतर
संन्यास घ्यावा हे ते उल्लेख़.
एकंदर भरपूर पात्रे
(35-40)
गाणारी पण
भरपूर पात्रे (14)
आहेत.
लेखक हे स्वत:
नट होते.
व त्याकाळच्या
नाट्यप्रकाराबाबत चांगले अनुभवी
होते.
म्हणजे
रंगमंचावर चांगली समृद्धी असावी.
आज हे नाटक
रंगमंचावर आणायचे झाल्यास ते
कठीणच ठरेल.
नाटकात
गुंतागुंत त्यामानाने कमी आहे.
पण नाट्य
भरपूर आहेत.
बोहल्यावरचे
लग्न थांबते नायक मोठ्या हिकमतीने
लग्न थांबवतो.
पण त्याच
बोहोल्यावर त्याचे लग्न होत नाही
!
ही सिनेमा
नाटकातली रुढी या काळानंतरची दिसते.
नाटकात
मारामारी आहे पण हातापायांची नाही.
शास्त्रातले
दाखले,
पुराणकथांचे
उल्लेख़ अशा वादपटुत्वातून ती येते.
'
वीर धनंजय जैसा
स्मृतिशास्त्राचा अक्षय भाता,
सारथि सद्गुरु
सरिसा हठवादी ते भट्टकटकभट,
त्या सन्मुख
लटपटले '
अशी ही
मारामारीची कथा.
हातापायांच्या
व आजकालच्या बंदुकांच्या रुढी
पडण्यापूर्वीची ही वेळ.
ही मारामारी पण हिंसक नव्हती असे
समजु नये.
जे लग्न झालेच
नाही त्याला लग्न मानून जन्मभर
मरण्याची शिक्षा त्यात होती.
पुरुषांच्या
सोयीसाठी रुढी,
स्त्रियांसाठी
मात्र 'न
स्त्री स्वातत्र्यमर्हती'
शास्त्राचा
स्पष्ट उल्लेख़.
असा तो भयंकर
हिंसक संघर्ष आहे.
त्या काळी एखाद्या पुरुषाचे नाव
कांचन असणे गैर नव्हते.
मुलाकडून हुंडा
घेणे देखिल रुढीला मान्य होते.
साखरपुडा
साधेपणाने होत होता.
लोकांसमोर
असलेले प्रष्न केवळ वादविवादाने
सोडवले जात असत.
काळ बदलतो,
रुढी बदलतात
आपण शास्त्रही विसरुन जातो.
पण संघर्षाचे
काय?
तो तर असतोच
ना?
संगीत शारदा
हे नाटक अशाच एका संघर्षाची कथा
आहे ती सच्ची असावी म्हणूनच ती
खूप गाजली. |